
“आपलं आयुष्य आपण उभारतो, पण समाज टिकवतो तो एकत्र येऊन.” हीच भावना आज अधिक महत्त्वाची ठरते. महाराष्ट्रातील काही भागांवर आलेल्या पूरामुळे हजारो कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांचे संसार पाण्यात वाहून गेले, शाळा बंद पडल्या, आणि आयुष्य उरले ते फक्त संघर्ष. अशा परिस्थितीत फक्त शासन नाही, तर समाजातील प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. या भावनेतून Keystone School of Engineering, Pune ने “एक हात मदतीचा — संवेदनशील महाराष्ट्राच्या सामाजिक बांधिलकीचा” उपक्रम हाती घेतला आहे.
मराठवाड्यात पूरस्थिती 2025: शेतकऱ्यांचा संघर्ष
मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेली पूरस्थिती , म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळीच नव्हे, तर अख्खं वर्षचं अंधारात ढकलणारे संकट होय. ही केवळ शेतीची हानी नाही, तर कष्टकऱ्यांच्या स्वप्नांचा विध्वंस आहे. घामाने भिजवलेल्या मातीतलं जिवापाड जपलेलं पीक वाहून गेलंय,
मराठवाडा, सोलापूर, या भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावं जलमय झाली. हजारो शेतकरी कुटुंबं आपल्या संसारासह पाण्याखाली गेली. शेतातील उभं पीक वाहून गेलं, जनावरे, पाण्यात गेलं ते फक्त पिक नव्हतं, तर शेतकऱ्यांची स्वप्न, लेकरांची दिवाळी आणि शाळेची फी पण वाहून गेली..! सर्व काही उद्ध्वस्त झालं. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ हा पडतो, निसर्ग सुद्धा शेतकऱ्यांवर काय कमी अन्याय करतो!
मायमाऊलींचे गळ्यातून फुटणारे हुंदके व डोळ्यातून ओघळणारे अश्रू या समाजाच्या संवेदनशील मनाला जागवणारे आहेत. या पावसामुळे कित्तेक शेतकऱ्यांनी आत्महत्या पण केल्या आहेत, कारण त्याच्या डोक्यावर असलेल्या कर्जामुळे, साध खिशातला एक रुपया जरी पडला तरी माणूस त्या ठिकाणी तीनदा जाऊन पाहतो… मग, रक्ताचं पाणी करून, कष्टानं जपलेलं मातीमोल होतं तेव्हा त्याच्या जीवाला काय वाटत असेल. सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. बळीराजा अक्षरशः हतबल झालाय.
शेतकऱ्यांच्या आयुष्यातील दिवाळीतील अंधार
दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि प्रकाशाचा सण. पण पूरग्रस्त भागात या वर्षी दिवाळी म्हणजे केवळ आठवणींतील सण. फराळ नाही, फटाके नाहीत — एका शेतकऱ्याचे शब्द मन हेलावून टाकतात:
“या वर्षी दिवाळी नाही, फक्त पोट भरण्याचंही संकट आहे.”
ही केवळ आर्थिक नाही, तर भावनिक हानी आहे. बळीराजाचं जगणं थांबलं, फक्त ओलसर भिंती, पाण्याने भरलेलं अंगण आणि भुकेली पोटं. शेतकऱ्यांच्या घरात दिवे नाही, पण त्यांच्या डोळ्यांत त्यांचा आत्मविश्वास अजूनही जिवंत आहे, त्याच्यामध्ये अजूनही आशेचा एक किरण आहे — की समाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हीच जाणीव ठेवून चे Director, Principal, विद्यार्थी, शिक्षक, आणि NSS स्वयंसेवकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखली आणि मदतीचा उपक्रम राबवला. सर्वानी ठरवली शेतकऱ्यांची दिवाळी चांगली झाली पाहिजे, फूल ना फुलाची पाकळी तर नक्कीच देऊ शकतो.
पूरग्रस्तांसाठी मदतीला धावून जाणारे पुण्यातील पहिले कॉलेज
आजवर हा शेतकरी आपल्याला अन्नधान्य देत आला. आता त्याच दिवाळी अंधारात जाऊ नये, म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करायचं. सामाजिक बांधिलकी म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही, तर कृतीतून दाखवलेली जबाबदारी. Keystone School of Engineering हे पुण्यातील पहिले कॉलेज ठरले, ज्यांनी पूरग्रस्त भागांसाठी एक हात मदतीचा, संवेदनशील महाराष्ट्राच्या सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम हाती घेतला.
दिवसात संकलन मोहीम सुरू झाली. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी मिळून किराणा किट, कपडे आणि औषधं संकलित केली. या किटमध्ये समाविष्ट होतं –
साखर २ किलो, तांदूळ ३ किलो, खाद्यतेल १ लिटर, तूरडाळ १ किलो, १ किलो मीठ, १ किलो हळद, आवश्यक औषधं आणि वस्त्रं.
सोलापूर जिल्ह्यातील देवगाव, खंडकोणी, कांडाळगाव, सहस पिपळगाव हे गावे निवडण्यात आली. NSS स्वयंसेवक आणि शिक्षक प्रतिनिधी मंडळाने मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन या वस्तूंचं वितरण केलं. गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे हात धरून आशीर्वाद दिले, काहींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. विद्यार्थ्यांना समजले की सामाजिक सेवा हीच खरी अभियांत्रिकी आहे.
शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य
कॉलेजचे Director Prof. यशोधन सोमण सर नेहमी म्हणतात की,
“केवळ शिक्षणच नव्हे, तर सामाजिक जबाबदारी शिकवणं हे आमचं ध्येय आहे.”
मुख्याध्यापक Dr. संदीप कदम, प्रा. सागर राजेभोसले, प्रा. सुवर्णा फुले, प्रा. प्रदीप कराळे, श्री. राकेश कात्रे, प्रा. सुमित वाणी आणि सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी केलं. विद्यार्थ्यांनी मदत संकलन, पॅकिंग, वाहतूक, वितरण, नोंदणी सर्व काही नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले.
विद्यार्थ्यांनी केवळ सामाजिक जबाबदारीच नाही, तर संवेदनशीलता, टीमवर्क, लीडरशिप शिकली. समजले की: Teamwork आणि Leadership या गुणांचीही शिकवण घेतली. त्यांना जाणवलं की —
“Engineering म्हणजे फक्त Technology नव्हे, तर मानवतेचा संगम आहे.”
आशेचा दीप — सामाजिक बांधिलकीची जाणीव
या कॉलेजमध्ये शिकणारे जास्त विद्यार्थी हे मराठवाड्यातील — परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर, जालना, आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधील आहेत. यातील अनेक विद्यार्थी स्वतः शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे आमच्यासाठी हा उपक्रम केवळ समाजकारण नव्हता, तर आमच्या स्वतःच्या घराघरांतील वेदना, ओळखीचे चेहरे आणि आपल्या मातीतल्या संघर्षाशी जोडलेला एक भावनिक प्रवास होता.
आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्ही ज्या Keystone School of Engineering, Pune हे फक्त शिक्षण देत नाही, तर सामाजिक बांधिलकी जपणारं कुटुंब आहे. आज पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करताना जाणवलं की:
“शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातलं ज्ञान नाही, तर माणुसकीची शिकवण आहे.”
विद्यार्थ्यांमध्ये social responsibility आणि humanity वाढली. प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिलं — कुणी अन्नधान्य, कुणी कपडे, कुणी औषधे, आणि कुणी वेळ दिला. Marathwada flood relief drive ने दाखवलं की:
“एकतेच्या बळाने कोणतंही संकट लहान ठरू शकतं.”
आमचं हे कॉलेज म्हणजे एक family of changemakers, आणि आमचे शिक्षक म्हणजे त्या प्रेरणेचे दीपस्तंभ. उपक्रमाने दाखवून दिलं की पुण्यातलं पहिलं कॉलेज म्हणून त्यांनी केवळ ज्ञान नव्हे, तर संवेदना जोपासल्या आहेत. ही दिवाळी आमच्यासाठी केवळ प्रकाशाचा सण नाही, तर आशेचा दीप आहे — जो आमच्या मराठवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात पुन्हा उजेड पेरतोय.
Keystone School of Engineering ने शेतकऱ्यांसाठी मदतीचा उपक्रम राबवला. या उपक्रमाचा अनुभव तुम्ही इथे Instagram Reel मध्ये पाहू शकता
Khelo24betc, haven’t been using it for too long, but so far so good. Nothing spectacular, but nothing terrible either. If you’re looking for a new platform, might be worth a look. khelo24betc.
Yo, 100 jilislot got some fire slots! Been hitting some nice wins lately. The layout’s clean, easy to find what you’re looking for. Worth checking out if you’re chasing those jackpots! Go check out 100jilislot now!
888SLOT có hệ thống cảnh báo chơi có trách nhiệm – giúp bạn kiểm soát thời gian và ngân sách, tránh nghiện cược. TONY12-30
Nhà cái 888slot cung cấp dịch vụ cá cược thể thao đỉnh cao, cho phép bạn đặt cược vào nhiều môn thể thao khác nhau như bóng đá, bóng rổ, tennis và nhiều môn khác. TONY01-12
deegarciaradio.com trở thành địa điểm giải trí trực tuyến hàng đầu của rất nhiều hội viên trong giới cá cược online bởi mang lại thế giới săn thưởng sự mới mẻ, đặc sắc. 888SLOT Anh em khi tham gia sẽ được trải nghiệm từng cung bậc cảm xúc khác nhau. TONY01-26
Slot tại 888SLOT có tính năng “xem lại lịch sử quay” – giúp bạn phân tích chu kỳ game, từ đó đưa ra quyết định cược thông minh hơn trong những vòng tiếp theo. TONY01-26
Downloaded the apptk88 app, and it’s buttery smooth to use. Perfect for a cheeky bet on the go, or if I’m bored and there’s nothing on tv. Give it a download and have a crack at apptk88
WW888slot is calling my name! Spinning those reels and hoping for a big win! Fingers crossed. Good luck if you try it ww888slot.
Yo what’s up, heard some good things from the homies about tk88bet. Gonna check them out myself. They said the odds are good and customer service is on point. Fingers crossed I win big! Definitely gonna try tk88bet out!
Tại 188V , sự minh bạch trong quy trình nạp rút tiền là kim chỉ nam cho mọi hoạt động vận hành của chúng tôi. Quý khách có thể thực hiện giao dịch thông qua đa dạng các phương thức từ ngân hàng nội địa đến các ví điện tử phổ biến nhất hiện nay. TONY02-02O